*सूचना क्रमांक* : *१०४३*
*दिनांक* : *२३/०५/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *पुणे,मुंबई,कोल्हापूर,नाशिक या विभागातील जिल्ह्यांमधील आंतर जिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना.* __________________________________________
✏सर्व जिल्हा परिषद शाळांतील आंतर जिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की, *दिनांक 23/05/2017 ते 25/05/2017 (सकाळी 11 पर्यंत) पुणे,मुंबई,नाशिक,कोल्हापूर या विभागातील जिल्ह्यांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी लॉगिन देण्यात येणार आहे.या विभागातील जिल्ह्यांना यापूर्वी ही सुविधा देण्यात आलेली होती परंतु अद्यापही या विभागातील जिल्ह्यामधील काही शिक्षकांची माहिती भरावयाची राहून गेल्याने त्यांना आपली माहिती नोंद करावयाची अंतिम संधी देण्यात येत आहे.25/05/2017 ला सकाळी 11 वाजता सदर सुविधा बंद करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.* यानंतर कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आहेत.
*टीप:* *सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत जर समजुतीचा घोटाळा झालेला असेल तर सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.*
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
*स्टाफ पोर्टल मध्ये काम करताना आलेल्या अडचणी कळविण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.*
*लिंक*
https://goo.gl/OuoQ5u
*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक*
goo.gl/j9nFGk
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या. ब्लॉग ला भेट द्या.
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा