बुधवार, ३१ मे, २०१७

विश्व दूध दिवस

जागतिक दूध दिन म्हणजे जागतिक अन्न म्हणून दुधाचे महत्त्व ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेद्वारे (एफएओ) एक दिवस स्थापित केला आहे.  2001 पासून प्रत्येक वर्षाला हे 1 जून रोजी साजरा करण्यात आला. दिवस डेरी क्षेत्राशी संबंधित असलेल्या क्रियाकलापांवर लक्ष देण्याची संधी प्रदान करण्याचा उद्देश आहे. निरोगी संतुलित आहाराचा दूध हा महत्वाचा भाग आहे. वर्ल्ड मिल्क डे शब्दाचा प्रसार आणि जगभरातील अनेक देशांमध्ये दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांच्या सर्व पैलूंचे साजरे करण्याचा उत्तम अवसर प्रदान करतो. इतिहास संपादन जागतिक दूध दिन प्रथम 2001 मध्ये एफएओने नियुक्त केला होता. 1 जून ही तारीख म्हणून निवडली गेली कारण अनेक देश वर्षभरात त्या दिवशी दुधाचे दिवस साजरे करीत होते.

मंगळवार, ३० मे, २०१७

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती

अधिकारकाळ।   डिसेंबर ११,इ.स. १७६७ -ऑगस्ट १३,इ.स. १७९५

राज्याभिषेक।   डिसेंबर ११,इ.स. १७६७

राज्यव्याप्ती।    माळवा

राजधानी।   रायगड

पूर्णनाव पुण्यश्लोक
      अहिल्याबाई खंडेराव होळकर

पदव्या       राजमाता

जन्ममे ३१ , इ.स. १७२५चौंडीगाव ,जामखेडतालुका, अहमदनगर ,महाराष्ट्र , भारत

मृत्यू।    ऑगस्ट १३,इ.स. १७९५महेश्वर

पूर्वाधिकारी।  खंडेराव होळकरदत्तकपुत्रतुकोजीराव होळकर

उत्तराधिकारी।   तुकोजीराव होळकर

वडील।     माणकोजी शिंदे

राजघराणे।    होळकर


जागतिक तंबाखू निषेध दिन

तंबाखूमुळे कँसर (कर्करोग) होऊ शकतो

तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात.

भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कँसर (कर्करोग) असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे.भारतात, ५६.४ % स्त्रियांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.९०% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्‍सर आणि इतर कँसर होण्‍याचे कारण धूम्रपान आहे.

शनिवार, २७ मे, २०१७

विनायक दामोदर सावरकर


जन्म:मे २८, इ.स. १८८३
भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र,


मृत्यू:फेब्रुवारी २६, इ.स. १९६६
दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत

चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना:अभिनव भारत
अखिल भारतीय हिंदू महासभा

प्रमुख स्मारके:मुंबई बिहार दिल्ली अंदमान

धर्म:हिंदू

प्रभाव:लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराज


वडील:दामोदर सावरकर

आई:राधा सावरकर

पत्नी:यमुनाबाई विनायक सावरकरतळ

(रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन  )
.
टोपणनाव: रमाई, रामू, रमा
मृत्यू: २७ मे १९३५
वडील: भिकू धुत्रे (वलंगकर)
आई: रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)
पती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर
रमाबाई भीमराव आंबेडकर उपाख्य रमाई (?? - मृत्यू : २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.

बालपण

रमाईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. . भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.


शुक्रवार, २६ मे, २०१७

A B L एॅक्टिव्हिटी बेस लर्निंग



*ABL म्हणजे Activity Based Learning
 ( कृतीयुक्त अध्ययन पद्धती )*


ABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे प्रभावी व चिरकाल टिकणारे असते. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते.

ABL पद्धतीची संकल्पना :-

या पद्धतीत मुलांना स्वतः कृती करून शिकावे लागते. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी च्या वर्गांच्या अभ्यासक्रमाची मांडणी माईल स्टोन मध्ये *( milestone )* मध्ये केलेली आहे. यात घटक, उपघटक, पाठय मुद्दे वेगवेगळ्या कृतींमध्ये विभागले आहेत. या कृती/ कार्ड यांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे मइलेस्टोल होय. असे प्रत्येक विषयात 10 ते 15 टप्पे म्हणजे *milestone* आहेत.
या milestone ची मांडणी केलेला तक्ता म्हणजे ladder होय. ladder हे त्या विषयाचे वार्षिक नियोजन असते. प्रत्येक ladder वरील प्रत्येक milestone मध्ये 10 ते 14 कृती / कार्ड असतात. यातील कार्डांपैकी पहिल्या कार्डावर संकल्पना / संबोध स्पष्ट केलेला असतो. पुढे पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते व भरपूर सराव असतो. सरावानंतर शेवटी मूल्यमापनावर / शिष्यवृत्तीवर आधारित कार्ड वि. सोडवावे लागते. मूल्यमापन कार्ड (गुच्छ) म्हणजे त्याने अभ्यासलेल्या घटकावर आधारित चाचणी असते. ती चाचणी वि.स अचूक सोडवत आली तर तो milestone त्या वि.चा पूर्ण झाला असे समजावे . जर त्यास अचूक चाचणी सोडवता नाही अली तर पुन्हा त्या milestone मधील कार्ड सोडवावेत.


गुरुवार, २५ मे, २०१७

खडू-फळा मोहीम [ OB - Operation black-board


* सन १९८६ च्या धोरणाने शाळेची इमारत, तेथील साधनाचा अभाव यांच्यामुळेच गळतीचे प्रमाण वाढले. 

* शालेय वातावरण उत्साहजनक करण्याच्या भूमिकेतून खडू - फळा मोहीम सन १९८७-८८ पासून सुरु करण्यात आली. 

* या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेला दोन मोठ्या खोल्या असणारे वर्ग, मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्वछतागृह, दोन शिक्षक व त्यापैकी एक शिक्षिका, फळा, नकाशे खेळणी ग्रंथालय अशा आवश्यक अध्ययन सुविधा. 

* या योजनेचा आता विस्तार करण्यात आला आहे, त्यानुसार दोनऐवजी तीन वर्ग व तीन शिक्षक देण्यात येतो. 


बुधवार, २४ मे, २०१७

प्राथमिक शिक्षकांची कर्तव्ये

प्राथमिक शिक्षकांची कर्तव्ये


१} दैनंदिन टाचण काढणे.

२}नियमित व  वेळेवर शाळेत येणे.

३}विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे .

४}शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहणे .

५} शाळेच्या वेळेत कोणतेही खाजगी काम न करणे .

६ } वर्ग सजावट करणे .


मंगळवार, २३ मे, २०१७

सरल महत्वाचे

सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०४५*
*दिनांक* : *२४/०५/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती व scert* यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
__________________________________________
➡ *Student पोर्टल मध्ये इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्याचे मॅन्युअली प्रमोशन करण्याची सुविधा सर्व  जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना* __________________________________________

✏ *सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येत आहे की,सन 2016-17 हे शैक्षणिक वर्ष संपून सन 2017-18 सुरु झालेले आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी हे आता मागील इयत्तेमधून पुढील इयत्तेत गेलेले आहेत.student पोर्टल मध्ये मागील वर्षी  सर्व विद्यार्थ्यांचे सिस्टिम द्वारे ऑटो प्रमोशन केले होते.परंतु असे ऑटोप्रमोशन करताना काही अडचणी निर्माण झाल्याने या वर्षी आपल्या शाळेतील इयत्ता 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन हे सिस्टिम द्वारे ऑटो न होता प्रत्येक शाळांनी हे प्रमोशन मॅन्युअली करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.*

*सदर काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत ही 20 जून 2017 देण्यात आलेली आहे.*


सोमवार, २२ मे, २०१७

RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे...

मुख्याध्यापकाची कामे.

सर्वांना मोफत शिक्षण कायदा २००९ अन्वये
मुख्याध्यापकाची कामे .
१)       वयाचा पुरावा नसतांनाही बालकास शाळेत प्रवेश
दयावा.
शाळेत दाखल करतांना पालका जवळ वयाबाबतचा
सक्षम पुरावा नसतांना सुदधा मुख्याध्यापकांनी
मुलास पालकाच्या प्रतिज्ञा पत्रावरून दाखल केले
पाहिजे.
२) बालकास वर्षभरात केव्हाही प्रवेश देणे.
बालकाला त्याच्या सोईनुसार जेथे सोईस्कर वाटेल
तेथे त्याला शैक्षणिक सत्रात केव्हाही प्रवेश दयावा.
३) विदयार्थ्याचे स्थलांतरण – पालकाचे अथवा
बालकाचे कोणत्याही कारणस्तव स्थलांतर झाल्यास
विदयाथ्र्यास त्याचा शाळा सोडल्याचा दाखला
देण्यात यावा.देतांना विदयार्थी जेथे शिकू इच्छीत
आहे तेथील शाळेच्या मुख्याध्यापकाचे संमतीपत्र
घ्यावे.असे संमतीपत्र प्राप्त होताच संबंधीत
मुख्याध्यापकांनी त्वरित शाळा सोडल्याचा
दाखला हस्तांतरण करावा.

सरल महत्वाचे


*सूचना क्रमांक* : *१०४३*
*दिनांक* : *२३/०५/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *पुणे,मुंबई,कोल्हापूर,नाशिक या विभागातील जिल्ह्यांमधील आंतर जिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना.* __________________________________________

✏सर्व जिल्हा परिषद शाळांतील आंतर जिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की, *दिनांक 23/05/2017 ते 25/05/2017 (सकाळी 11 पर्यंत) पुणे,मुंबई,नाशिक,कोल्हापूर या विभागातील जिल्ह्यांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी लॉगिन देण्यात येणार आहे.या विभागातील जिल्ह्यांना यापूर्वी ही सुविधा देण्यात आलेली होती परंतु अद्यापही या विभागातील जिल्ह्यामधील  काही शिक्षकांची माहिती भरावयाची राहून गेल्याने त्यांना आपली माहिती नोंद करावयाची अंतिम संधी देण्यात येत आहे.25/05/2017 ला सकाळी 11 वाजता सदर सुविधा बंद करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.* यानंतर कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आहेत.


शुक्रवार, १९ मे, २०१७

शालेय पोषण आहार योजनेचा इतिहास


भारतातील शाळांमध्ये मिड डे मीलचा मोठा इतिहास आहे. 1925 मध्ये, मद्रास म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधील प्रतिकूल मुलांसाठी एक मिड डे मील प्रोग्रॅम सुरु करण्यात आला. 1980 च्या मध्यापर्यंत तीन राज्यांतील गुजरात, केरळ आणि तामिळनाडू आणि पांडिचेरीच्या केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक स्तरावर शिकणार्या मुलांसाठी स्वयंरोजगारासाठी एक शिजवलेल्या मिड डे मील प्रोग्रामची सार्वत्रिक स्थापना केली. 1 999-9 1 पर्यंत मिड डे मील प्रोग्रामच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची संख्या सार्वत्रिक किंवा मोठ्या प्रमाणात बारा राज्यांमध्ये वाढ झाली होती.1. नोंदणी, प्रतिधारण आणि उपस्थिती वाढविण्यासाठी आणि मुलांमध्ये पोषणात्मक पातळी सुधारण्याबरोबरच 15 ऑगस्ट 1 99 5 रोजी प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचा पोषण केंद्र (एनपी- एनएसपीई) लाँच करण्यात आला,

बुधवार, १७ मे, २०१७

प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते.
पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरु होते. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण.पहिली ते पाचवी प्राथमिक शिक्षण. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शिक्षण नववी ते बारावी माध्यमिक शिक्षण असा शिक्षणाचा आकृतीबंध आहे. प्राचीनकाळी प्राथमिक शिक्षण हे शिक्षककेंद्रित होते. अलीकडील काळात त्यामध्ये बदल होवून ते शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित बनले आहे.

शनिवार, ६ मे, २०१७

शालेय समुपदेशनाची गरज



संपादन करा

शाळा,अभ्यास,विद्यार्थी,शिक्षक व अभ्यासक्रम ह्या गोष्टीशिवाय शाळेमध्ये अनेक गोष्टी असतात. शाळेत पुस्तक, अभ्यास, अभ्यासक्रम व भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांबरोबरच एक वेगळं नातं असतं ते समुपदेशकाचं. समुपदेशन आणि मराठी शाळा त्यातल्या त्यात खास करून जि. प. च्या शाळा आणि किशोरवयीन मुलांबरोबर काम करताना विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे शारीरिक-मानसिक-सामाजिक आरोग्य या विषयावर काम करतात प्रत्येक शाळा, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक ते अगदी शिक्षक कर्मचारी वर्गाशी संवाद साधला जातो. शालेय मुलांसाठी समुपदेशन ही महत्वाची गरज आहे.