शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

शैक्षणिक साहित्य वाटप

शिंगरी गावचे पोलीस पाटील श्री.अजितजी कदम यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसा निमित्त जि. प. शाळा शिंगरी येथील विद्यार्थाना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. जि. प. शाळा शिंगरी यांच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद.💐

संगणक संच प्राप्त

१४ व्या वित्त आयोग योजने अंतर्गत ग्रुप ग्राम पंचायत शिंगरी च्या वतीने जि. प. शाळा शिंगरी ला संगणक संच देण्यात आला. ग्राम पंचायतीचे खूप खूप धन्यवाद💐

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली


भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.